दिंडोरी रोड, पेठरोडची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली

0

पंचवटी (प्रतिनिधी) ता. १५ : उच्च न्यायालयाच्या आदेशाने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचा मनपाच्या अतिक्रमण पथकाचा आजचा सातवा दिवस आहे.

आज सकाळी पंचवटीतील दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी चित्रपटगृह परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळे मनपाचे हटविली. त्यानंतर ११च्या सुमारास पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली.

पोलिस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

*