सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत ‘ओबीसी’ विद्यार्थिनींचा समावेश करा

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी

0

नाशिक | प्रतिनिधी

राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत इतर मागासवर्गीय विद्यार्थिनींचा समावेश करण्यात यावा अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे विजा, भज इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग मंत्री प्रा.राम शिंदे यांच्याकडे केली आहे.

छगन भुजबळ यांनी मंत्री प्रा.राम शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कधी करण्याच्या हेतूने इ.५ वी ते इ.७ वीतील मुलींसाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर इ.८ वी ते इ. १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

त्याअंतर्गत इ.८ वी ते इ. १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलींना प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने रुपये १०० /- प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते.

या शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील दलित विद्यार्थीनीला दरमहा रु.१०० /- मिळतात. ज्या घरात मुलगी म्हणजे ओझे समजले जाते अशा घरात तिला आता न्याय मिळू शकेल. मुलींचे सक्षमीकरण कारणे हा या योजनेमागचा हेतू आहे.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही योजना राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना लागू करण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे या योजनेत इतर मगासवर्गीय विद्यार्थिनींचा समावेश करून त्यांना सदर योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी मंत्री. प्रा.राम शिंदे यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

*