Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिल्लीतील ‘एनएसजी’च्या कार्यक्रमात नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांचा सन्मान

Share

नाशिक । ऑपरेशन ब्लॅक कमांडो या मोहिमेस 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एनएसजीने ‘प्रवाह-अ ट्रिब्युट टू द 26/11 हिरोज’ या धर्तीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर्यन मॅन किताब पटकवणारे नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक आणि सध्या राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले कृष्ण प्रकाश यांना सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे आज (दि.18) सकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम पार पडला. दोन्हीही अधिकाऱ्यांचा नाशिकशी संबंध असल्याने नाशिकच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे.

यावेळी हाफ मॅरेथॉन, मिनी मॅरेथॉन आणि रन फॉर फनचे आयोजन करण्यात आले होते. फ्रान्स येथे आयोजित करण्यात आलेल्या आर्यन मॅन ट्रायलेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन या दोघांनी ती स्पर्धा यशस्वीरित्या पार करून किताब पटकावला. स्पर्धेदरम्यान दोघांची उपस्थिती एनएसजी कमांडोंसाठी खूप प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा एनएसजीने व्यक्त करत या दोन्ही अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते.

याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. सिंगल याना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते फ्रान्स येथील आयर्नमॅन-2018 ही खडतर स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

डॉ सिंगल यांनी या कार्यक्रमादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १० किमी धावण्याच्या स्प्रधेत सहभाग नोंदवला. त्यानंतर त्यांचा आयटीबीपीचे डायरेक्टर जनरल एस.एस.देसवाल यांच्या हस्ते पदक देण्यात आले. तसेच स्पर्धेतील काही विजेत्या खेळाडूंना डॉ सिंगल यांच्या हस्ते पदक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

सर्वात अभिमानास्पद

ऑपरेशन ब्लॅक कमांडो या मोहिमेस 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा दलातर्फेे (एनएसजीने) होणारा सन्मान हा बहुमूल्य आणि सर्वात अभिमानास्पद आहे. मुळात आपण आर्यन मॅन स्पर्धेत उतरल्यावर आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून स्पर्धा पूर्ण केली. त्यात यश मिळवले. परंतु, या यशाचा हा सर्वात मोठा गौरव आहे.

– डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!