Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण प्रशासनाची चौकशी; नाशिकचे उपसंचालक निलंबित

Share

मुंबई | किशोर आपटे

राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नंदूरबार धुळे आणि नाशिक येथील शिक्षण विभागातील अधिका-यांच्या भ्रष्टाचाराची सकृतदर्शनी तथ्य आढळून आल्याने चौकशी केली जात असून याबाबत विभागाच्या उपसंचालकाना तत्काळ निलंबीत करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

याबाबत किशोर पाटील आणि अन्य सदस्यांची लक्षवेधी सूचना चर्चेला होती. यावेळी बोलताना पाटील यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे माजी शिक्षणसंचालकांच्या सही शिक्क्यांचा वापर करून पाचशे पेक्षा जास्त शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आणि त्यांच्याकडून पाच लाख ते दहा लाख रूपये उकळण्यात आल्याचे पाटील म्हणाले.

याप्रकरणी सरकारने केलेल्या प्राथमिक तपासात तथ्य आढळून आले असे सांगून शिक्षणमंत्री गायकवाड यांनी या प्रकरणी नाशिकच्या उपसंचालक यांना निलंबीत करण्यात येत असल्याचे सांगितले. याबाबत सध्या नंदूरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव येथील शिक्षणाधिका-यांची देखील चौकशी केली जात असून या प्रकरणी चार संस्था चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

शाळांच्या पटांवर बोगस विद्यार्थ्यांच्या पट संख्या दाखविण्यात येत असून याला आळा घालण्यासाठी बायोमँट्रीक पध्दती आणि आधार लिंकचा वापर करून पारदर्शकता आणण्याचा विचार केला जात आहे असे त्या म्हणाल्या.

अध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयावर संपूर्ण राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेण्यात यावा असे सांगितले. किशोर पाटील म्हणाले की ज्या अधिका-यांवर आरोप आहेत त्यांच्या मार्फत चौकशी झाल्यास न्याय मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे निलंबन करण्यात आले तरच निपक्ष चौकशी केली जावू शकेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!