Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विद्युत खांबावरून पडून मनपा कर्मचारी जखमी

Share

नवीन नाशिक | प्रतिनिधी

रस्त्यावरील पथदीपाचा बंद बल्ब बदलत असताना पथदीप कोसळल्याने मनपा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. कर्मचाऱ्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

अधिक माहिती अशी की,  आज (दि.19) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मनपा विद्युत विभागाचे कर्मचारी मंगेश रामदास वाघ (वय 40) हे आयोध्यानगरी परिसरातील बंद पथदीपाचा बल्ब बदलण्यासाठी खांबावर चढले होते.

नुकत्याच आलेल्या पावसामुळे खांब गंजला होता. काम सुरु असताना अचानक खांब अर्ध्यावरून तुटला. खांबावर चढलेले वाघ हे सुमारे 15 ते 20 फुटांवरून खाली कोसळले.

दरम्यान, वाघ यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खांब पडल्यावर त्या बाजुलाच उभी असलेली चारचाकी (एमएच 15 एफटी 4890) हिचे देखील नुकसान झाले आहे.

आयोध्यानगरी परिसरात असलेले सर्वच विद्युत खांबांची मनपातर्फे तपासणी करण्यात यावी. जेणे करून असा अपघात पुन्हा घडणार नाही, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!