महासभेत विरोधक धरणार भाजपला धारेवर?

0

नाशिक (प्रतिनिधी) |  नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर करवाढीच्या मुद्यावरून पालिकेतील  सत्ताधारी भाजपने आणलेला अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे, उद्या होणाऱ्या महासभेत विरोधी पक्ष सत्ताधारी भाजपची गळचेपी करण्याची शक्यात आहे.

नाशिक मधील करवाढ व विविध मुद्यावरून पालिकेत रणकंदन माजले होते, त्यामुळे काही दिवसांपूर्वी भाजपा गटनेते यांनी मुंढे याच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव नगरविकास खात्यास सादर करण्यात आला होता. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी  अविश्वास ठराव पास करण्यासाठी उद्या (दि.१) विशेष महासभा बोलविण्यात आली आहे. परंतु महासभेच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे भाजप तोंडघशी पडली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयाच्या माध्यमातून ट्विटरवर #wesupportMundhe, #Walkforcommissioner, #MiNashikkar हॅशटॅगच्या माध्यमातून मोहीम उभारण्यात आली होती. तसेच फेसबुकवर मुंढे यांच्या समर्थनार्थ विशेष पेज   तयार करून त्यांना पाठींबा देण्यात आला.

आज अनेक सुजाण नाशिककरांनी मुंढे यांच्या पाठींब्यासाठी ‘वॉक फॉर कमिशनर’ या मोहिमेंतर्गत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून टिळक पथ मार्गे राजीव गांधी भवन येथे रॅली काढण्यात आले.

दरम्यान, उद्या होणाऱ्या महासभेत शिवसेना, मनसे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष काय भूमिका घेतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे. शिवसेना सरसकट करमाफीवर ठाम असून आयुक्तांनी जर करवाढ मागे घेतली तर अविश्वासाला पाठींबा नाही अशी भूमिका मनसे घेणार आहे. तर, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या मुद्द्यावर भाजपची गळचेपी करण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांवर अविश्वास आणण्याची तरतुद करा : ज्या प्रमाणे महापालिका आयुक्त मुंढे यांच्यावर नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला, तशी तरतुद कायद्यात आहे. अशीच तरतुद कायद्यात करुन चुकीची कामे करणार्‍या नगरसेवकांविरुध्द नागरिकांना अविश्वास ठरावा आणता आला पाहिजेत अशी मागणी आनंद सौदागर यांनी केली.

 

LEAVE A REPLY

*