Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कोरोनाचा वाढता धोका; नाशिकमधील उद्याने उद्यापासून राहणार बंद; महासभाही रद्द

Share

नाशिक | प्रतिनिधी

राज्यात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडुन जमाव बंदीचे आदेश जारी केल्यानंतर आणि रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत उद्या (दि.17) पासुन शहरातील सर्वच उद्याने 31 मार्च 2020 पर्यत बंद ठेवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्याची महापालिकेची महासभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान उद्या(दि.16)पासुन महापालिकेत येणार्‍या नागरिकांना स्वच्छतेसाठी सॅनिटाईजर देण्यात येणार असुन तातडीची उपाय योजना म्हणुन प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

महापौर दालनात आज महापौरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत महापालिकेकडुन सुरू असलेल्या उपाय योजना व प्रतिबंधासंदर्भात घेतले जाणार्‍या निर्णयाची माहिती दिली. याप्रसंगी सभागृह नेते सतिश सोनवणे यावेळी उपस्थित होते.

कोरोना संदर्भात राज्यातील स्थिती काही महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करतांना महापौर म्हणाले, महापालिकेने अंगणवाड्या, शाळा, तरणतलाव, व्यायामशाळा व नाट्यगृहे बंद केल्यानंतर आता उद्यानांत होणारी गर्दी टाळण्यासाठी आजपासुन महापालिकेची सर्वच उद्याने 31 मार्च पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असुन यासंदर्भातील निर्देश संबंधीत अधिकार्‍यांना देण्यात आलेले आहे.

तसेच नागरिकांनी देखील गर्दी होईल अशा ठिकाणी जाणे टाळावे. यातून आपण या साथीला रोकु शकतो. शहरात परदेशात जाऊन आलेल्या नागरिकांनी तत्काळ महापालिका किंवा जिल्हा रुग्णालयाना यासंदर्भात माहिती द्यावीत, यामुळे संबंधीतावर लक्ष ठेवण्यात येऊन साथीला थांबविणे शक्य होणार आहे.

साथीच्या पार्श्वभूमीवर शहराची चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आले असल्याचे सांगत महापौर म्हणाले, शहराच्या स्वच्छतेचे जादा काम करावे लागणार असल्याने ठेकेदारीच्या माध्यमातून कामगार लावून सफाईचे काम केले जाणार आहे.

तसेच महापालिकेच्या सर्वच सफाई कामगारांना मास्क व सॅनेटायझर देण्याचे काम आता केले जाणार आहे. तसेच शहरात अस्वच्छता करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे काम अमुल्य क्लिनअप या संस्थेने आठ वर्षापुर्वी आपण उपमहापौर असतांना केले होते.

आताही रस्त्यावर थुंकणार्‍यावर व सार्वजनिक जागेत शौचास बसणार्‍यांना प्रतिबंध घालणे गरजे आहे. यामुळे अस्वच्छता करणार्‍यावर दंडाची कारवाई करण्यासाठी एखाद्या संस्थेला काम तातडीने देणे गरजेचे आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!