Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशहिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार; शिमल्यात भूस्खलन, ३० ते ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार; शिमल्यात भूस्खलन, ३० ते ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले

नवी दिल्ली | New Delhi

देशातील अनेक भागांत पावसाने (Rain) दडी मारली आहे. मात्र, काही भागांत मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या ढगफुटीमुळे अनेक गावे, रस्ते आणि शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली गेली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमधील कालका-शिमला, चंदीगड-मनाली, शिमला-धर्मशाला, पांता-शिलाई एनएचसह ८०० हून अधिक रस्ते बंद आहेत. त्यामुळे २००० हून अधिक मार्गावरील बससेवा बंद पडल्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. याठिकाणी हवामान विभागाकडून (Meteorological Department) पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या भेटीवर शरद पवार पुन्हा बोलले; म्हणाले…

तर शिमलामधील (Shimla) समरहिलजवळील एका शिव मंदिराजवळ मोठे भूस्खलन (Landslide) झाले असून या भूस्खलनात ३० ते ३२ लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचे समजते. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून मंदिरात पूजा करण्यासाठी काही लोक पोहोचले होते. यावेळी भूस्खलन होऊन ही दुर्घटना घडली. याठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याने मदत व बचावकार्यात अडथळे येत आहेत.

तसेच हिमाचलमधील सोलन जिल्ह्यात (Solan District) रविवारी रात्री उशिरा झालेल्या ढगफुटीमुळे पुरासोबत आलेल्या ढिगाऱ्यात दोन घरे आणि एक गोठा वाहून गेला असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण बेपत्ता झाले असून पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच दरड कोसळल्याने अनेक महामार्ग आणि रस्ते बंद झाले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

तुम्ही नातीगोती जपायची अन् कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का?; राऊतांनी पवारांना थेट सुनावलं

- Advertisment -

ताज्या बातम्या