Thursday, April 25, 2024
Homeनाशिकऑक्सिजन एक्सप्रेस'द्वारे २७. ८२६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त

ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे २७. ८२६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त

नाशिक । Nashik

जिल्ह्यातील ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी विशाखापट्टणम् येथून शनिवारी (दि.२४) ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’च्या माध्यमातून दोन टँकरच्या द्वारे २७.८२६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा मेडिकल ऑक्सिजन नियंत्रण कक्षाचे समन्वयक दत्तप्रसाद नडे यांनी दिली.

- Advertisement -

विशाखापट्टणम् येथून ऑक्सिजन एक्सप्रेस द्वारे नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे चार टँकर्स उतरविण्यात आले आहेत.

यापैकी दोन टँकर्स नाशिक व दोन टँकर्स अहमदनगर जिल्ह्यासाठी आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी एकूण २७.८२६ मेट्रिक टन आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी २४.७३६ मेट्रिक टन असे एकूण ५२.५६० मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचे चार टँकर्स प्राप्त झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या २७.८२६ मेट्रिक टन ऑक्सिजनपैकी चार मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा धुळे जिल्ह्यास देण्यात येणार आहे. यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी २३.८२० मेट्रिक टन इतका साठा शिल्लक राहणार असल्याची माहिती नडे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या