Photo Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी खुले

0
नाशिक |प्रतिनिधी 
‘गुलाब फुलांचे गुलशनाबाद’ अशी पुरातन ओळख असलेल्या नाशिकनगरीत आजपासून तीन दिवस फुलांचा सुगंध दरवळणार आहे.
महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय पुष्पोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी होत आहे. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गिरीष महाजन व ‘माझ्या नवर्‍याची बायको’ फेम झीटीव्ही स्टार अभिनेत्री अनिता दाते यांची या उद्घाटनाला मुख्य उपस्थिती असणार आहे.
आजपासून (दि. २२) पुढील तीन दिवस पुष्पोत्सवाचा लाभ नाशिककरांना घेता येणार आहे. पुष्पोत्सवानिमित्त राजीव गांधी भवन सजले असून येथील व्यासपीठ, आकर्षक सजावट, स्टॉलची व्यवस्था, मंडपाला अतिशय सुरेख अशी सजावट करण्यात आली आहे.
पुष्पोत्सवाच्या निमित्ताने उद्या (दि.२३) सकाळी १० वाजता पुष्परचना व सजावट या विषयावर सेमीनार आयोजीत करण्यात आले आहे.
यात अवधुत देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. पुष्पोत्सवाचा समारोप येत्या रविवारी सायंकाळी ६.३० वा. डॉ. नमिता कोहक (मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफ टाईम क्वीन यूएसए) यांच्या उपस्थित होणार आहे.

सर्व फोटो : सुधाकर शिंदे, देशदूत डिजिटल नाशिक

LEAVE A REPLY

*