मनपा सानुग्रह अनुदानाचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात

0

नाशिक । महानगरपालिका सेवकांना दिवाळीच्या निमित्ताने सानुग्राह अनुदान देण्यासाठी महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे स्पष्ट झाल्याने आता सानुग्रह अनुदानाचा चेंंडू आयुक्तांच्या कोर्टात गेला आहे. दरम्यान, यसादंर्भातील फाईल आस्थापना व समाजकल्याण विभागाकडून आयुक्तांकडे गेल्याची चर्चा असून आता आयुक्तांच्या निर्णयाची प्रतीक्षा सेवक करत आहेत.

महापालिकेत आज सभागृह नेते दिनकर पाटील आयुक्तांना पत्र देऊन सानुग्रह अनुदान 25 दिवस अगोदर सेवकांच्या हातात पडावेत, याकरता निर्णय होण्यासाठी तातडीची बैठक घ्यावीत, अशी विनंती केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पाटील यांनी लेखा विभागासोबत चर्चा केली.

यात सेवकांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याची माहिती संबंधीत विभागाकडून देण्यात आल्याची माहिती पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यामुळे आता सानुग्राह अनुदान देण्यास प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सेवकांची दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील फाईल तयार झाली असून ही फाईल दोन विभागांकडून आयुक्तांकडे जाणार असून यावर आयुक्तच निर्णय घेणार आहेत.

महासभेने अलीकडेच सेवकांना दिवाळीनिमित्त सानुग्राह अनुदान देण्याचा ठराव मंजूर केला आहे. महापालिकेकडून दरवर्षी सेवकांना दिवाळीपूर्वी सानुग्राह अनुदान जाहीर करते. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेक मार्गाने खर्चात बचत करण्याचा सपाटा लावला आहे.

परिणामी यंदा सेवकांना सानुग्राह अनुदान वाटपासंदर्भात सांशकता व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर आज लेखा विभागाकडून आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे आणि अनुदान देण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे आता आयुक्तांकडून यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, अशी शक्यता आहे. यामुळे आता आयुक्तांच्या निर्णयाकडे सेवकांचे डोळे लागले आहेत.

LEAVE A REPLY

*