Saturday, April 27, 2024
Homeनाशिक‘निवेक’कडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाखाची मदत

‘निवेक’कडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाखाची मदत

सातपूर | प्रतिनिधी

संपूर्ण जगभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यशासनाच्या वतीने करोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विविध स्तरातून मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली जात आहे.नाशिकमधील निवेकदेखील यात मागे राहिले नसून आज एक लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी करण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिकमधील निवेक हि संस्था उद्योजकांना फिट ठेवण्यासाठी सातत्याने काम करते आहे. आज निवेकमधील अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी बजावत आहेत.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या निवेक या संस्थेच्या वतीने सामाजिक दायित्व या भूमिकेतून मुख्यमंत्री कोषाला एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला असून उद्योजकांच्या सामाजिक दायित्वाबद्दल श्री गवळी यांनी आभार मानले. यावेळी निवेकचे अध्यक्ष संदीप गोयल, जनक सारडा, राजकुमार जाँली, संदीप सोनार, अशोक हेंबाडे, पंकज खत्री,  प्रणव संघवी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या