Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : निवृत्तीनाथ महाराज समाधीची पालकमंत्र्यांच्या हस्ते सहपत्नीक महापुजा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापुजा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सहपत्नीक पूजा केली. आज सकाळी नऊ वाजता ही पूजा संपन्न झाली.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगांवकर, उपाध्यक्ष दिपक लोणारे, मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पंडीत महाराज कोल्हे, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दिपक गिरासे, मुख्याधिकारी प्रवीण निकम आदी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वरनगरीत संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सुमारे दीड लाखावर भाविक, वारकरी दाखल झाले आहेत. गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यातील दिंडीही आली असून, महिला वारकर्‍यांची संख्या लक्षणीय आहे.

300 च्या आसपास लहान, मोठ्या दिंड्या आत्तापर्यंत दाखल झाल्या आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिका, संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर व गजानन महाराज मंदिर यांच्याकडून दिंड्यांचे स्वागत करण्यात आले.

आज सकाळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापुजा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी देवस्थानच्या वतीने भुजबळ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!