Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिककरांनो ‘निसर्ग’ चक्रीवादळाला घाबरू नका; अधिक धोका नाही

नाशिककरांनो ‘निसर्ग’ चक्रीवादळाला घाबरू नका; अधिक धोका नाही

नाशिक | प्रतिनिधी 

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईपासून 600 किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव होईल. याचा मोठा फटका महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीला बसेल असा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याचा पश्चिम पट्ट्यात आदिवासी बहुल भाग आहे याठिकाणी प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

- Advertisement -

अनेक नागरिक वादळ येणार असल्यामुळे भयभीत झाले आहेत. असे असतानाच नाशिकचे हवामान तज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की, नाशिकमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात मात्र, फार मोठे काही नुकसान या वादळामुळे होईल असे अजिबात नाही. गेल्या अनेक दशकांत याठिकाणी एकही वादळ आलेले नाही, वा नुकसानही झालेले नाही.

संपूर्ण राज्यात 4 जूनपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर हे वादळ घोंघावण्याची  शक्यता वर्तविली जाते आहे. मात्र, नाशिक जिल्ह्याला या वादळाचा फटका फारसा बसणार नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

कसमादे परिसरातील नागरिकांनी वादळाबाबत भीती व्यक्त करत काय केले पाहिजे असे प्रश्न सोशल मीडियातून विचारले होते. त्यांनंतर हवामान तज्ञ किरणकुमार जोहरे यांनी देशदूत शी बोलताना सांगितले की, वादळामुळे फार मोठे नुकसान होणार नाही. मात्र, काळजी घेतलेली योग्य राहील.

नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळपासून वातावरणात कमालीचे बदल झाले आहेत. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जलधारादेखील कोसळल्या आहेत. काही ठिकाणी वादळी वारा आल्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याच्या किरकोळ घटना घडल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या