Thursday, April 25, 2024
Homeनाशिक‘कोरोना’ची काळजी घेत निर्भया पोलीस मँरेथाँन होणार, इतर कार्यक्रम मात्र रद्द :...

‘कोरोना’ची काळजी घेत निर्भया पोलीस मँरेथाँन होणार, इतर कार्यक्रम मात्र रद्द : आयुक्त विश्वास नांगरे पाटील

नाशिक | प्रतिनिधी 

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा फटका नाशिक पोलिसांच्या निर्भया मँरेथाँनलाही बसला आहे. मँरेथाँन काळजीपूर्वक घेण्यात येणार असलायची माहिती   पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. ते आज आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते.

- Advertisement -

नाशिक शहर पोलीस दलातर्फे पोलीस व जनता यांचे मधील संबंध हे सुद्रढ व सलोख्याचे राहणयासाठी दरवर्षी पोलीस मँरेथाँनचे आयोजन करण्यात येते.

यावर्षीच्या मँरेथाँन नाशिक करांनी चांगला प्रतिसाद नोंदवला आहे. १८ हजार ४८० जणानी नावनोंदनी केली आहे. या मध्ये महिलांची संख्या ५ हजार ७२० इतकी आहे. या व्यतिरिक्त विविध शाळांचे २४ संघ हे संपुर्ण मॅरेथॉन मार्गावर प्रोत्साहनासाठी कार्यक्रम सादर करणार होते.

महिला सक्षमीकरण व महिला दिनाच्या साजरी करणासाठी एकुण ४० पेक्षा जास्त एनजीओच्या ३ हजार सभासद सहभागी होणार होते.तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते ६ हजार नाशिककरांसाठी महिलांसाठी चर्चासत्र (Talk Show) चे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे हा कार्यक्रम रद्द  करण्यात आला आहे.

निर्भया मॅरेथॉनमध्ये धावण्याची स्पर्धा वगळता सर्वच कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे. मेरेथॉनदरम्यान, शाळकरी मुलांतर्फे प्रोत्साहनपर जे कार्यक्रम होणार होते ते रद्द करण्यात आले आहेत. त्या एवजी ढोल पथकांचा समावेश करण्यात आला आहे.

मँरेथाँनमध्ये लहान मुले, वयोवृध्द व्यक्ती तसेच सध्या सर्दी, ताप, खोकला असा आजार असलेल्यांनी सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच स्पर्धेतील लहान मुले, जेष्ठनागरीकांचा ३००० सहभाग रद्द करण्यात आला आहे. सामाजिक संस्थांच्या मुलांचा, दिव्यांगांचा सहभाग रद्द तसेच परदेशी खेळाडुंचा सहभाग रद्द करण्यात आला आहे.  ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

५ किमी ची मॅरेथॉन ०७.४५ ऐवजी ०६.३० वा., ३ किमी ची मॅरेथॉन ०८.०० ऐवजी ०७.३० वा. ठेवण्यात आली असून ०८.१५ वा. होणारी NGO रली रद्द करण्यात आली आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या