Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘निर्भया’ने घडवली रिक्षावाल्यास अद्दल; दोघे ताब्यात

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरातील एका महाविद्यालयातील तरुणी महागडा मोबाईल रिक्षात विसरली असताना. रिक्षावाल्याने तिला एक हजार रुपये घेऊन ये तेव्हाच मोबाईल मिळेल असे सांगितले. यानंतर, तरुणीने निर्भया पथकाशी संपर्क साधला असता पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले; तसेच या विद्यार्थिनीचा मोबाईलदेखील परत केला. दरम्यान,  दोघा संशयितांवर गुन्हा दाखल्र करण्याचे काम सुरु आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीतील लेडीज होस्टेलमधील एक विद्यार्थिनी अशोकस्तंभ येथे शिकवणीसाठी गेली होती. तिथून ती एमएच १५, ईएच ४३८३ या रिक्षामधून होस्टेलला पोहोचली. या विद्यार्थिनीचा २२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल रिक्षात राहिला.

विद्यार्थिनी होस्टेलमध्ये पोहोचल्यानंतर मोबाईल रिक्षात राहिल्याचे तिच्या लक्षात आले. दरम्यान, कुठलाही विलंब न करता विद्यार्थिनीने मैत्रिणीच्या मोबाईलवरून तिच्या मोबाईलवर फोन केला. यावेळी रिक्षाचालकाने मी आता गिरणारे येथे असून एक हजार रुपये घेऊन ये आणि मोबाईल घेऊन जा असे सांगितले.

यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मुलीने थेट निर्भया पथकास संपर्क साधून घडलेला प्रकार कथन केला. यानंतर या मुलीला घेऊन पथक गिरणारेच्या दिशेने रवाना झाले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक आर. एस. तडवीस, वाहनचालक पोलीस हवालदार पाडवी, कासरल नामक पोलीस शिपाई, सिंग, राठोड यांचा समावेश होता.

या पथकाने गिरणारे येथे जाऊन रिक्षाचालक व त्याचा जोडीदार अशा दोघा संशयितांना ताब्यात घेत विद्यार्थिनीचा मोबाईल परत केला. दोघा संशयितांना सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!