Friday, April 26, 2024
Homeनाशिकइंग्रजीच्या पेपरला पकडले १९ कॉपी बहाद्दर; नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १० कॉपी केसेस

इंग्रजीच्या पेपरला पकडले १९ कॉपी बहाद्दर; नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १० कॉपी केसेस

नाशिक ।  प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचा इंग्रजीचा पेपर मंगळवारी (दि.18) सुरळित पार पडला.

- Advertisement -

नाशिक विभागात 19 कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले. त्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 10 त्याखालोखाल जळगावला 7 तर नंदूरबारमध्ये 2 कॉपी केसेस दाखल झाल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि.20) माय मराठीचा पेपर होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातून 75 हजार 343 तर विभागातून 1 लाख 66 हजार 718 विद्यार्थी इंग्रजीच्या पेपरला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 1 लाख 65 हजार 305 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. तर 1 हजार 173 विद्यार्थ्यांनी दांडी मारली.नाशिक जिल्ह्यात 95 तर विभागात 234 केंद्रांवर पेपर घेण्यात आला.

त्यासाठी 234 केंद्र संचालक व 65 पर्यवेक्षकांची नियुक्त करण्यात आली होती. विभागात 19 कॉपी प्रकरणे आढळले. बुधवारी (दि. 19) शिवजयंतीनिमित्त सुटी असून गुरुवारी सकाळ व दुपार सत्रात विविध भाषा विषयांचे पेपर होणार आहे. मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम्, तमिळ, तेलगू, पंजाबी, बंगाली तर दुपारी 3 ते 6 या सत्रात उर्दु, फ्रेंच, पाली भाषेचा पेपर होणार आहेत.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके

परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, डाएटचे प्राचार्य, प्राथमिक आणि माध्यमिकचे उपशिक्षणाधिकार्‍यांचा समावेश असलेल्या सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांनी ठिकठिकाणी केलेल्या तपासणीत 19 कॉपीकेसेस दाखल करण्यात आल्या.

ज्या केंद्रांवर पाच पेक्षा अधिक कॉपी केसेस होतील, तेथील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा शिक्षण मंडळाचे नाशिक विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी दिला आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या