Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : व्हायरल झालेल्या ‘त्या’ इलेक्ट्रिक बसचा नाशिकशी काहीही संबंध नाही

Share

नाशिक | प्रतिनिधी 

कालपासून सोशल मीडियात एका इलेक्ट्रिक बसचे काही फोटो पोस्ट केले जात होते. अनेकांनी कुतूहलाने जास्तीत जास्त ठिकाणी स्मार्ट नाशिकची नवी बस या मथळ्याखाली फोटो शेअर केले. मात्र, महापालिकेच्या बससेवेसाठी निविदा मागविण्यात आल्या असून यामध्ये या ठेकेदाराचा काहीएक संबंध नाही असे निदर्शनास आले. हे केवळ एका राजकोट येथील कंपनीकडून प्रसिद्धीसाठी ठेवण्यात आलेला देखावा असल्याचे सांगण्यात आले आहे.

नाशिक महापालिकेने राज्य परिवहन महामंडळाची तोट्यातील बससेवा ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्वावर खासगी ठेकेदारामार्फत बससेवा चालवणार आहे. यामध्ये ठेकेदाराकडून चारशे बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. यापैंकी दोनशे डीझेल व सीएनजी इंधनावर तर उर्वरित दोनशे इलेक्ट्रिकवर चालविण्यात येणार आहे.

यासाठी तीनदा निविदा काढूनही अद्याप ठेकेदार गवसलेला नाही. निविदा प्रक्रियेत नसलेल्या राजकोट येथील एका ठेकेदाराने इलेक्ट्रिक बस नाशिकमध्ये आणत नाशिककरांची झोप उडवून दिली.

ही बस स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव परिसरात उभी होती. या बसवर नाशिक स्मार्ट सिटी असा एक फलकही लावण्यात आला होता. मात्र, ही निव्वळ प्रसिद्धी स्टन्ट असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!