Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : सर्वांना सोबत घेऊन काम करणार; मनपाचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पदभार स्वीकारला

Share

नाशिक | नाशिक मनपाचे नवे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज सकाळी राजीव गांधी भवन मुख्यालयात पदभार स्वीकारला. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. केंद्रीय पथकासोबत जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यामुळे गमे यांनी स्वत:च पदभार स्वीकारला. नंतर त्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन प्रमुख प्रकल्प व प्रश्‍नांबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला.

मनपा पदाधिकारी-नगरसेवक व माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात अधिकारांवरुन निर्माण दरी रुंदावत गेल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त मुंढे यांची बदली केली होती. त्यावेळी मुंढे यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे हे येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र निवडणूक कामांमुळे गमे तत्काळ हजर न झाल्याने मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

अखेर मंगळवारी गमे यांच्या बदलीचे आदेश झाल्यानंतर आज गमे यांनी मनपात जाऊन आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर आयुक्तांनी लगेच विभाग प्रमुखांची बैठक घेतली. अधिकार्‍यांचा परिचय करून घेतल्यानंतर सुरू असलेले प्रकल्प, उपक्रम व महत्त्वाच्या प्रश्‍नांबाबतची माहिती अधिकार्‍यांकडून जाणून घेतली. लवकरच विभागनिहाय आढावा घेतला जाईल, याबाबत माहिती तयार ठेवा, असेही त्यांनी विभागप्रमुखांना सांगितले.

आढावा बैठकीनंतर आयुक्त गमे यांनी महापौर दालनात जाऊन महापौर रंजना भानसी यांची भेट घेतली. यावेळी महापौरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सभागृह नेते दिनकर पाटील, नगरसेवक भगवान दोंदे व प्रशासन उपायुक्त महेश बच्छाव उपस्थित होते.

समन्वयातून विकास

आज पहिल्या दिवशी आयुक्त गमे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही दिवस आपण मनपाच्या सर्वच विभागांतील कामकाजाचा आढावा घेणार आहोत. लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून शहराचा विकास साधणार आहोत. ङ्गस्मार्ट सिटीफच्या कामांना वेग दिला जाणार आहे. माजी आयुक्त मुंढे यांनी जनहिताचे व शहर विकासासाठी घेतलेले निर्णय पुढेही चालू ठेव. त्यात काही सुधारणा कराव्याशा वाटल्यास त्या करू, असेही गमे यांंनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!