Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी स्वीकारला पदभार

Share

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी आज पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद दालनात त्यांचे स्वागत मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी स्वागत केले.

पदभार स्वीकारताच भुवनेश्वरी यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेत संवाद साधला. भुवनेश्वरी यांनी यवतमाळ येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम बघितले आहे.

तसेच याच ठिकाणी त्यांच्याकडे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा कार्यभारदेखील होता त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी प्रश्नांहा हाताळण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.

पहिल्याच दिवशी त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेत संवाद साधला. एस. भुवनेश्वरी या २०१५ च्या बॅचच्या आयएएस  अधिकारी आहेत. त्यांना महसूल व आदिवासी विकास विभागाच्या कामाचा अनुभव आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत पाच महिला पदाधिकारी आहेत. यापूर्वीही नाशिक जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून विनीता सिंगल या महिला आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान आज पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच नवनियुक्त सीईओ एस. भुवनेश्वरी यांनी डॉ. गीते यांच्या समवेत जिल्हापरिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांची भेट घेतली.

अध्यक्षा सांगळे यांनी एस. भुवनेश्वरी यांचे स्वागत केले. याप्रसंगी उपाध्यक्षा नयना गावित, महिला व बालकल्याण सभापती  अर्पणा खोसकर, बांधकाम सभापती मनीषा पवार  यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!