Type to search

स्री जातीचे अर्भक आढळले कचराकुंडीत; भारतनगरमधील घटना

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

स्री जातीचे अर्भक आढळले कचराकुंडीत; भारतनगरमधील घटना

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नुकत्याच जन्मलेल्या स्री जातीचे अर्भक मिळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अर्भकास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भारतनगर झोपडपट्टी येथील कचरा कुंडीत दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मंदा विष्णू शिंदे या कचराकुंडी असलेल्या रस्त्यावरून जात होत्या. दरम्यान, त्यांना हे अर्भक दिसून आले.

कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्यांनी या अर्भकास जिल्हा रुग्णालयास दाखल केले व पोलिसांना या प्रकारची माहिती दिली.

बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!