Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात नव्याने ५० करोना रूग्णांची भर; जिल्ह्याचा आकडा ११०८ वर

नाशिक जिल्ह्यात नव्याने ५० करोना रूग्णांची भर; जिल्ह्याचा आकडा ११०८ वर

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामिण भागात करोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. आज जिल्ह्याभरात नव्याने 50 रूग्णांची भर पडली. यात ग्रामिण भागातील 2, जिल्ह्याबाहेरील 3, नाशिक शहरातील 13 तर मालेगावच्या 32 रूग्णांचा सामावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या 1108 वर पोहचली आहे. तर आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात जिल्ह्यातील एकुण 277 अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले. यात 171 निगेटिव्ह तर 50 पॉझिटिव्ह आढळले. यात नाशिक शहरातील कामठवाडे येथील 5, भद्रकाली दुध बाजार 1, अजमेरी चौक 1, नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौक 2, वडाळा 1, जत्रा हॉटलेजवळ 1 , मखमलाबादरोड 1 असे रूग्ण आहेत. यामुळे नाशिकशहराचा आकडा 152 वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील आज केवळ 3 रूग्ण आढळून आले आहेत. यात नांदगाव येथील 1, दिंडोरी 1 व ओझर येथील 1 यांचा सामावेश आहे. तर यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 160 झाला आहे.

तर मालेगाव शहरातील 26 रूग्ण पॉझिटिव्ह आले असून यात 3 मुंबई रेल्वे पोलीस व मालेगाव शहर पोलीस ठाण्यातील असे 9 पोलीस पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे मालेगाव येथील रूग्णांचा आकडा 748 वर पोहचला आहेे.

जिल्ह्यात एकुण मृत्यू झालेल्यांचा आकडा 60 आहे. तसेच आज दिवसभरात 47 करोनाग्रस्त रूग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून मुक्त करण्यात आले आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 786 वर पोहचला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 10 हजार 887 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 9 हजार 359 निगेटिव्ह, 1108 पॉझिटिव्ह आले आहेत.

यातील 222 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 460 अहवाल प्रलबिंत आहेत. तर आज नव्याने 210 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील 98, जिल्हा रूग्णालय 6, ग्रामिण 82, मालेगाव 20 संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

  • एकूण कोरोना बाधित: 1108
  • मालेगाव : 748
  • नाशिक : 152
  • उर्वरित जिल्हा : 160
  • जिल्हा बाह्य ः 50
  • एकूण मृत्यू: 60
  • कोरोनमुक्त : 786
- Advertisment -

ताज्या बातम्या