Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘एनडीसीसी’च्या शाखेत शिलापूर येथील शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Share
पंचवटी | वार्ताहर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिलापूर येथील शेतकऱ्याच्या शेतीचा लिलाव न्यायालयात दावा दाखल असताना देखील लिलाव काढल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने बँकेतच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँक प्रसाशनाने लिलावास तात्पुरती स्थगिती दिली आहे.
नाशिक तालुक्यातील शिलापूर येथील शेतकरी माधवराव कहांडळ यांची शिलापूर गावात ५ एकर ११ गुंठे शेती आहे .त्यांनी जून २०१६ साली शिलापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडून खरीप द्राक्ष पीक रक्कम १ लाख ७५ हजार,द्राक्ष मंडपासाठी ९० हजार ९९० आणि त्यावर झालेले २३ हजार ९३१ रुपये असे एकूण २ लाख ८९ हजार ९२३ रुपयांचे कर्ज घेतले होते.
कालांतराने हे कर्ज शिलापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये भरले होते . मात्र, त्यांची हि रक्कम सोसायटीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरणा केली नसल्याने जिल्हा बँकेने कहांडळ यांच्या शेतीच्या लिलावाची घोषणा केली होती. एनडीसीसी बँकेच्या पंचवटी कारंजा येथील शाखेत कहांडळ यांच्या शेतजमिनीचा लिलाव गुरुवार दि २६ रोजी ठेवला होता.
यावेळी शेतकरी माधवराव कहांडळ यांनी बँक अधिकाऱ्यांना याबाबत न्यायालयात दावा सुरु असल्याचे सांगत न्यायालयात दावा असल्याने लिलाव प्रक्रिया करता येत नसल्याची विनंती केली . मात्र,येथील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत लिलाव प्रक्रिया सुरु ठेवण्यास सांगताच माधवराव कहांडळ या शेतकऱ्याने आपल्या सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी उपस्थित नागरिकांनी कहांडळ यांना पकडत आत्महत्या करण्यापासून रोखले. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माधवराव कहांडळ यांना ताब्यात घेत समज देत सोडून दिले आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!