Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आजी -माजी संचालक म्हणतात.. नियमानुसारच कर्जवाटप

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनियमित कर्ज वाटपप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेल्या 38 आजी-माजी संचालकांनी आपण नियमानुसारच कर्ज वाटप केल्याचे नोटिसीला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. 347 कोटी कर्ज वाटपाप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी नोटिसा धाडल्या होत्या. मंगळवारी (दि.18) उत्तर देण्याची अंतिम मुदत होती.

अनियमित कर्जवाटप प्रकरणी सहकार कायदा कलम (88) अन्वये जिल्हा बँकेच्या आजी-माजी 38 संचालकाची चौकशी सुरू होती. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी याप्रकरणी नोटिसीला उत्तर देण्यासाठी मंगळवारीची मुदत दिली होती.

आमदार जे. पी. गावित, माजी आमदार अनील आहेर, दिलीप बनकर, शिरीष कोतवाल, वसंत गिते, वैशाली कदम, डॉ. शोभा बच्छाव, राजेंद्र डोखळे, धनंजय पवार, गणपतराव पाटील, माणिकराव शिंदे, अविनाश अरिंगळे, माणिकराव बोरस्ते, नानासाहेब सोनवणे, संदीप गुळवे, सुनील ढिकले आदी 18 माजी संचालकातर्फे अ‍ॅड. प्रमेद पाटील यांनी जबाब सादर केले.

ज्या 12 ंसंस्थांना 347 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती. त्यामुळे कर्ज वसूल होऊ शकत असल्याने कर्ज वाटप करण्यात आले. सहकार क्षेत्राला बळकटी मिळावी व ते टिकावे, हा कर्ज देण्यामागचा उद्देश होता, असे नोटिसीला दिलेल्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.

347 कोटींचे कर्ज थकीत असल्याने बँकेचा एनपीए दिवसेंदिवस वाढत आहे. लेखापरीक्षक जयेश आहेर यांनी कर्ज वाटप प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला होता. त्यात अनियमित कर्ज वाटपाचा ठपका ठेवला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!