Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांच्या गुरुवारी सहा सभा

Share
रामनाथ वाघ कृतिशील विचारांनी जगले- शरद पवार, Latest News Sharad Pawar Statement Ramnath Wagh Funeral Ahmednagar

नाशिक | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुरुवारी (१७ ऑक्टोबर) नाशिक जिल्ह्यातील सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यात तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली आहे.

सकाळी १० वाजता सटाणा, दुपारी १२.३० वाजता पिंपळगाव बसवंत, दुपारी ३ वाजता नांदगाव येथे सभा होणार आहेत. देवळाली विधानसभेतील उमेदवार व नाशिक पुर्व विधानसभेतील उमेदवार यांच्या प्रचारार्थ संयुक्त सभा सायंकाळी ५ वाजता पंचवटी मधील मखमलाबाद येथे सभा होणार आहे.

तर नाशिक पश्चिम विधानसभेतील उमेदवाराच्या प्रचारार्थ सायंकाळी ७ वाजता सिडको येथील पवननगर येथे  सभा होणार असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी कळवले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!