Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवळाली : राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे विजयाच्या समीप; २८ हजार मतांची आघाडी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शिवसेनेसाठी जिल्ह्यातील सर्वात मजबूत मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या देवळाली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी मुसंडी मारली आहे. सरोज अहिरे विजयाच्या अमीप आल्या असून अकराव्या फेरीअखेर त्यांनी दमदार २६ हजार मतांची आघाडी घेतली आहे.

माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी १९८९ पासून हा मतदारसंघ शिवसेनेसाठी मजबूत करून ठेवला होता.  २०१४ च्या निवडणुकीपूर्वी लोकप्रतिंनिधीत्व कायद्यांतर्गत त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक न लढवण्याची नामुष्की आल्यामुळे त्यांनी त्यांचे पुत्र योगेश घोलप यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले.

सरोज अहिरे यांना ११ व्या फेरीअंती ५१ हजार ८३५ मते मिळवली आहेत. तर घोलप यांना २५८५६ मते मिळाली आहेत. सरोज अहिरे यांना ११ फेरीअंती २६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. सहजासहजी ही आघाडी मोडीत निघण्याची शक्यता कमी असल्याने शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांचा मजबूत बालेकिल्लयास सुरुंग राष्ट्रवादीने लावलेला दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!