Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

उठ सूट ३७० कलमवर बोलता; इथला कोणता माईचा लाल काश्मीरमध्ये जमीन विकत घेईल – शरद पवारांचा घणाघात

Share

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर 

राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या, रोजगार घटले, शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची संख्या भरमसाट वाढते आहे. सत्ताधाऱ्यांना याचे भान राहिले नसून काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याची मार्केटिंग ते महाराष्ट्रात येऊन करत आहेत. इथला कोणता माईचा लाल काश्मीरमध्ये जमीन विकत घेईल सांगा बरं? असा सवाल करत शरद पवार यांनी विरोधकांना धारेवर धरले.

ते पिंपळगाव बसवंत येथे आयोजित जाहीर सभेत संबोधित करत होते. हायस्कूल पटांगणावर दुपारी पावणेदोन वाजता पवार यांचे आगमन झाले. त्यानंतर ते सभास्थळी रवाना झाले. यावेळी पवार म्हणाले,  सत्तेचा गैरवापर काॅग्रेस .राष्ट्रवादी यांनी कधीच केला नाही, आता निवडणूका आल्यावर कार्यालयावर धाडी टाकण्याचे काम सुरु केले.

मी मुख्यमंत्री असताना सहकारी बॅंकेचे माझं मंत्री या नात्याने केवळ संबध येणारच ना! या गोष्टीची दखल घेत ईडीने कार्यवाही करावी व महाराष्ट्राच्या कार्यवाहीचा परीणाम दिसु लागताच निवडणूका झाल्यावर कळवु असं सांगितलं.

सत्ता असेल तर जमीणीवर पाय व डोकं जागेवर ठेवावं लागतं. हे या सरकारकडे नाही आज राज्यात 16 हजार पर्यंत शेतकरी आत्महत्या झाल्या. तरी हे काही ऊपाय योजना करत नाहीत.

आज मुख्यमंत्री निवडणूकाच्या तोंडावर बोलतात की, आमच्या समोर काहिच नाही मी सांगु इच्छितो की मी, महाराष्ट्र कुस्तीगिर संघटनेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे कोण समोर आहे हे बघा व मगं बोला.

समोर कोणीच नाही आज आत्महत्या वाढल्या शेतीवर अवलंबून राहणारे कुटुंब वाढले आहेत. शेती कमी झाली कुटुंब वाढले, पण नोकरी वाढली नाही. देशातील उद्योग धंद्याची परवड झाली. नोकरयांवर गदा आली असताना या सरकारला फक्त 370 चाच मुद्दा दिसत आहे.

इतर प्रश्नावर बोलायलाच तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा हे फक्त 370 कलम वर च बोलतात.  महाराष्ट्रात आल्यावर शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही.

काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यावर तेथील जमीन विकत घेतली जाईल. प्रगती होईल असं बोललं जातं, पण मला सांगा यातील समोर बसलेल्यापैंकी कोण माईचा लाल तेथे जाऊन जमीन घेऊन शेती करील.

आज देशाची परीस्थिती गंभीर होत चालली असताना यांना फक्त 370 कलम दिसत आहे. जागतिक स्तरावर भारतातील मुलांना सर्वात कमी अन्न पुरवठा होत आहे. शोकांतिका आहे.

महाराष्ट्रची पण तीच दशा करून टाकली यांनी. पाच वर्षात महाराष्ट्र मागे गेला असून त्यातून बाहेर निघायचे असले तर बदल झाला पाहिजे. आणि तीच वेळ आता आली आहे. मी जाणार नाही सत्तेत पण बदल केल्याशिवाय पर्याय नसल्याचेही पवार याप्रसंगी म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!