Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : कॉंग्रेस-राष्ट्रवादी १२५-१२५ चा फॉर्म्युला; नव्या चेहऱ्यांना संधी देणार

Share

नाशिक | प्रतिनिधी 

विधानसभा निहाय आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी विधानसभा निहाय उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सोबत आहेत त्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुकांना समोरे जाण्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी १२५-१२५ जागांवर निवडणुका लढविण्याचा विचार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादीचे वजनदार नेते छगन भुजबळ मात्र, मुंबईत कॉंग्रेस राष्ट्रवादीची बैठक असल्यामुळे ते मुंबईत होते. यामुळे ते आजच्या पवार यांच्या दौऱ्यादरम्यान नसल्याचे सांगण्यात आले. माजी खासदार समीर भुजबळ मात्र, यावेळी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूक जवळ आल्या आहेत.  या आठवड्यात इलेक्शन कमिशन निवडणूका जाहीर करतील. – पंतप्रधान मोदी यांची नाशिक भेट झाल्यावर निवडणूक जाहीर होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यासोबतच दिवाळीच्या अगोदर आठवडाभर मतदान होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस, एनसीपी, शेकाप, जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानी राजू शेट्टी इतर डावे पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार असलायचे त्यांनी सांगितले.

पक्षातर्फे  नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असून  नवी पिढी उभी केली जाईल.  विरोधी पक्षात राहण्यात अनेकांची मानसिकता दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले.

विरोधी पक्षात राहण्यात मला अधिक समाधान मिळतं.  यापूर्वी अशी एकदा मेगा भरती झाली होती,  १९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता तेव्हा सत्ताधारी पक्षात जबाबदाऱ्या अधिक असतात.

आता मात्र वेग अधिक आहे.  पुढे लोक याचा निकाल घेतील, लोकांना हे काही समाधान देणारं नाही.  मुख्यमंत्री यांनी सर्वोत्तम काम केल्याच्या दाव्यावर जयंत पाटील पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहेत. उदयनराजेंना समज यायला फार उशीर लागला, १५ वर्ष वाया गेली असं उदयनराजे म्हणाले होते.

ईव्हीम मशीनवर निवडणुका होतील हे आमच्या हातात नाही, इलेक्शन कमिशनला सर्व राजकीय पक्षांनी पत्र दिलं होतं, अनेकांच्या सह्या त्यावर होत्या. परदेशात अनेक ठिकाणी ही पद्धत बंद केली आहे.  मात्र नंतर इलेक्शन कमिशन नंतर पत्र देत सगळी काळजी घेतली असल्याचं सांगितलं.

मनसेबाबतच्या प्रश्नावर पवार यांनी अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे.  मुख्यमंत्री यांनी माहिती घेऊन बोललं पाहिजे, आणि पत्रकारांनी माहिती घेऊन छापायला पाहिजे.  पाक पाहुणचारावर जाहीरपणे बोललो नाही,  पाकिस्तान आणि तेथील लष्कर प्रमुख स्वार्थासाठी भारताबाबत काहीही बोलतात

उद्धव ठाकरे जर राम मंदिर व्हावं असं बोलत असतील तर निवडणुका खूप जवळ आल्या आहेत काय तो निर्णय त्यांनी जाहीर करावा असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला.

लोकसभेला कुणाच्या हातात सत्ता द्यायची यावर लक्ष असतं मात्र विधानसभेला स्थानिक प्रश्न असतात त्यामुळे यावेळी वेगळं चित्र असेल.

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस होतील हे सांगण्याचा अधिकार आहे ते होऊ न द्यायचा हा आमचा अधिकार आहे.  निवडणूक झाल्यावर झेंड्यांचं बघू, आता निवडणुका पाहु द्या असेही ते यावेळी म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!