Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत पाच जागा घोषित; नांदगाव, बागलाण गॅसवर

Share

नाशिक | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रसने रात्री उशिरा आपली पहिली उमेदवार यादी जाहिर केली. या यादीत जिल्ह्यातील पाच ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केले असून नांदगाव  आणि बागलाणची जागा अद्याप गॅसवर आहे.

नांदगाव विधानसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ आणि बागलाणमध्ये विद्यमान आमदार दीपिका चव्हाण इच्छुक आहेत. मात्र, त्यांचे नाव पहिल्या यादीन न आल्याने या दोन्ही जागा गॅसवर असल्याचे समजते.

राष्ट्रवादीने काल जाहीर केलेल्या यादीत जिल्हातील येवला, सिन्नर, कळवण, दिंडोरी व निफाड या ५ मतदार संघांचा समावेश आहे. येवल्यात छगन भुजबळ, सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे, दिंडोरीत नरहरी झिरवाळ, कळवणमध्ये दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांचे सुपुत्र  नितीन पवार तर निफाडमधून दिलिप बनकर यांना संधी देण्यात आली आहे.

नाशिक शहरातील तसेच जिल्ह्यातील दोन महत्वाचे मतदार संघ मागे ठेवण्यात आले आहेत. विरोधकांमधील नाराज येथे गळाला लावण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.

तर विद्यमान आमदारांपैकी नांदगावचे पंकज भुजबळ व बागलाणच्या आमदार दिपिका चव्हाण यांना गँसवर ठेवल्याचे स्पष्ट चित्र आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!