Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात; नाशिकमधील देवीमंदिरांची सजावट

Share

नाशिक | चैत्राली अढांगळे

नाशिककरांना सध्या नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. शहरातील लहान मोठी मंदिरांची सजावट करण्यात येत आहे. विद्युत रोषणाईने मंदिरांना सजवले जात आहे.नवरात्रोत्सवाची तयारी जवळपास सर्वच ठिकाणी पूर्ण झालेली आहे.

शहरातील गोदाकाठ, रविवार कारंजा परिसरातील लहान मोठी सर्वच मंदिरांना सजावट करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी गरबा खेळण्यासाठी जागा नियोजित केली असून अनेकांना आता गरबा खेळण्याचे वेध लागले आहेत.

शहरातील रविवार कारंजा येथील गायधनी लेन मध्ये स्वयंभू मूर्ती रेणुका माता मंदिराची तयारी ही अंतिम टप्यात आली आहे. उत्स्फूर्त युवक मित्र मंडळातर्फ या भागात देवीची रूपे रोज नऊ दिवस वेगवेगळ्या रुपात बघायला मिळणार आहेत.

नवरात्रोत्सव काळात अष्टमीला नवचंडी याग तसेच होमहवन करण्यात येणार असून नऊ दिवस रोज एक नवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोज देवीला नवीन वस्त्र परिधान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. यासाठी मंडळाचे संस्थापक किरण चंद्रात्रे , चंद्रकांत भानोसे ,नितीन गायधनी दिलीप साळुंखे यांनी अथक परिश्रम घेतले असून मंडळातील युवकांचे सहकार्य लाभले आहे.

यासोबतच पंचवटी, सातपूर, नवीन नाशिक आणि नाशिकरोड परिसरात मोठ्या संख्येने नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. अनेक ठिकाणी पर्यावरण संरक्षणार्थ संदेश देण्यात आले आहेत. अनेक मंदिरे स्वच्छतेसाठी झाकून ठेवण्यात आली आहेत.

सर्व फोटो : चैत्राली अडांगळे

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!