Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नवरात्रीचा उपवास आहे?; मग ही बातमी तुमच्यासाठी

Share

नाशिक | बागेश्री पारनेरकर 

नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. अनेक महिला नऊ दिवस उपवास करून देवीचा जागर करतात. त्यामुळे बाजारात उपवासाच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. नवरात्रोत्सवात साबुदाणा, भगर या पिठांव्यतिरिक्त राजगिरा, उपवास भाजणी, शिंगाडा पिठ यांनाही विशेष मागणी असते. भाजणीच्या पिठाचे विविध प्रकारही बाजारात उपलब्ध आहेत.

उपवासाच्या पारंपरिक पदार्थांबरोबरच शिंगाडा पिठापासून बनवलेली कुरडई, चिवडा, लाडू, यांची मागणीही जोरात आहे. बाजारात खास दळलेले भगरीचे आणि साबुदाण्याचे पीठही विक्रीस उपलब्ध आहे. याबरोबरच सुकामेव्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, खजुराचे लाडू यांनाही विशेष मागणी आहे. अनेक मोठमोठ्या दुकानांमध्ये उपवासाचे रेडीमेड पदार्थ घेण्यासाठी लोकांची गर्दी दिसत आहे. हल्ली मोठ्या दुकानांबरोबर गृहउद्योग करणाऱ्या महिलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे अनेक महिला घराजवळचे बचत गट, घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला यांच्याकडून उपवासाचे पदार्थ, तयार पिठं घेण्याचा पर्याय निवडतात.


नवीन पदार्थांना मागणी

हल्ली उपवासाच्या पारंपरिक पदार्थांबरोबरच नवीन पदार्थांची मागणी वाढताना दिसत आहे. बाजारात उपवास इडली पीठ उपलब्ध आहे. अनेक जण सोमवारी भगर खात नाही. त्यासाठी खास सोमवार भगर विरहित उपवास भाजणी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या भाजणीला महिलांची विशेष मागणी आहे. उपवासाच्या इन्स्टंट सुपाचे रेडीमेड पॅकेट्स ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.


असे आहेत भाव (प्रति किलो)

भगर पीठ   –  १०० ते १५० रुपये
राजगिरा पीठ – १५० ते २०० रुपये
शिंगाडा पीठ – २५० ते ३५० रुपये
उपवास भाजणी – १०० पासून पुढे
उपवास इडली पीठ – ४५ रुपये (२०० ग्रॅम)


नवरात्रोत्सव काळात उपवासाच्या पदार्थांना अधिक मागणी असते. साबुदाणा, भगर पीठ याबरोबरच उपवास भाजणी, राजगिरा, शिंगाडा पीठ यांना विशेष मागणी असते. यावर्षी उपवास सूप आणि इडली पीठ यांना अधिक मागणी आहे.

– प्रमोद पटेल, व्यावसायिक (मे. गंगाराम गोविंद)


गेल्या काही वर्षांपासून घरगुती गृहउद्योग, महिला बचत गट यांची संख्या वाढत आहे. तयार पदार्थ घेताना स्वच्छता, ताजेपणा याचा अधिक विचार केला जातो. त्यामुळे उपवासाचे पदार्थ, फराळाचे पदार्थ, तयार पिठं घेताना महिला बचत गट, गृहउद्योग यांना अधिक प्राधान्य दिले जाते.

– उर्मिला सावजी, ध्येय महिला बचत गट अध्यक्ष.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!