Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

Video : नवरात्रोत्सवात भाव खातायेत नव्या धाटणीचे दागदागिने

Share

नाशिक | मानसी खैरनार 

गणेश उत्सवानंतर सर्वाना वेध लागलेत ते नवरात्रोत्सवाचे. महिला वर्गाची लगबग सध्या नवनव्या दागदागिन्याकडे असून महिलांना भावतील अशी दागिने सध्या बाजारात येऊ लागली आहेत. नवनव्या आणि अनोख्या धाटणीच्या दागिन्यांना बाजारात मागणी वाढली असून महिलावर्गाकडून बाजारात सध्या चाचपणी केली जात आहे.

नाशिकमध्ये बंगाली नागरिकांची संख्या मोठी आहे. यासोबतच गुजरातचाही प्रभाव अधिक असल्याने दरवर्षी अनोख्या प्रकारे गरब्याचा महोत्सव मोठ्या हर्शोल्लाहात साजरी होतो.

शहरात तर या दिवसात गराबाच्छूक मंडळीच्या उत्साहाला उधान आलेले असते. नवरात्रीचा पेहेराव आणि दागिन्यांची खरेदी यापासूनच त्यांचा नवरात्रोत्सव सुरु होतो.

नेहमीप्रमाणे नवरात्रोत्सवाला तरुणवर्गाने फॅशन ट्रेंडला प्रथम प्राधान्य दिले आहे. अर्थात बदलत्या उत्सवांसोबत फॅशन ट्रेंडही बदलल्याचे चित्र दिसून येत आहे.

नवरात्र उत्सवाचे वेध लागताच बाजारात दागिन्यांचे विविध प्रकार उपलब्ध झाली आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे नेकलेस, कमर पट्टा, कडा, जुडा त्यातील या वर्षी बाजारात नवीन आलेल्या मध्ये गोंडाचे दागिने, ऑक्सिडाईस आणि वुलन गोंडा यांचे मिश्रण असलेली दागिने , यात या वर्षी हाताने बनवलेली दागिन्यांमध्ये कापडी दागिने, दिसण्यास जड पण प्रत्यक्षात खूप हलकी, ही इंडो वेस्टर्न कपड्यांवर देखील घालू शकतो अशी आहे यास तरुणाईचा आकर्षण दिसून येत आहे.


भाड्याने दागदागिने घेण्याकडे अधिक कल 

दागिन्यांची किंमत अधिक असल्याने बाजारात भाड्याने पेहेराव आणि दागिने मिळून ३५० ते ७०० आहे. नवरात्र उत्सवात वर्षातून एकदाच तो पेहेराव किंवा दागिने घालायचे असल्याने विकत घेण्यापेक्षा ते भाड्याने घेऊ असा विचार करणारे अनेक जण आहेत. त्यामुळे हे सर्व साहित्य विकत घेण्यापेक्षा ते भाडेतत्वावर देण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच या वर्षी हँड मेड म्हणजे हाताने बनवलेली दागिन्यांना जास्त मागणी आहे.

वृषाली माहेगावकर, कला द डीझायनर्स.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!