Type to search

म्हणून राष्ट्रीय ‘तंत्रज्ञान दिवस साजरा केला जाऊ लागला

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सेल्फी

म्हणून राष्ट्रीय ‘तंत्रज्ञान दिवस साजरा केला जाऊ लागला

Share

आज राष्ट्रीय ‘तंत्रज्ञान दिवस’. तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशीलतेचे द्योतक मानले जाते. तंत्रज्ञान विकसनामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर झालं आहे. हा दिवस आजच्या दिवशी का साजरा करतात? आजच्या दिवसाशी भारताचा संबंध काय याबाबत जाणून घेऊयात.

11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डाॅॅ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-1 या आण्विक क्षेपणास्त्रााची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून 11 मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

देशाच्या या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन माजी पंत्रप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केला. भारतात 1999 सालीपासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!