Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या सत्यजित बच्छावची निवड

Share

नाशिक । प्रतिनिधी

विजय हजारे ट्रॉफी साठी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव ची तर महारष्ट्र संघांच्या ट्रेनरपदी नाशिकचे शेखर गवळी यांची निवड झाली आहे.

बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणार्‍या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला असून यात नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याचा संघात समावेश करण्यात आला आहे. मागील वर्षी मुस्ताक अली टी- 20 क्रिकेट स्पर्धेत भारतामध्ये सगळ्यात जास्त गडी बाद करण्याचा पराक्रम सत्यजित ने केला होता.

त्याचप्रमाणे विजय हजारे ट्रॉफी व रणजी करंडक स्पर्धेमध्येही उत्कृष्ट गोलंदाजी करत सत्यजित ने आपली चमक दाखविली होती. यावर्षी बडोदा येथे 24 सप्टेंबर पासून सुरू होणार्‍या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र संघ हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बडोदा, पंजाब, दिल्ली, विदर्भ, ओरिसा व हरियाणा या संघासोबत लढत देणार आहे.

तसेच महाराष्ट्राच्या संघाच्या ट्रेनर पदी रणजीपटू शेखर गवळी यांची पुनश्च निवड झाली आहे. सत्यजित बच्छाव व शेखर गवळी यांचे निवडीचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Format
M
Inn
Runs
W
BB
Econ
Avg
SR
4W
5W
1st class
2012–17
7
12
620
13
4/87
3.39
47.7
84.4
1
0
List A
2017–18
9
9
346
11
2/17
4.27
31.4
44.2
0
0
T20
2016–18
5
5
137
2
1/20
7.21
68.5
57.0
0
0
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!