Type to search

Breaking News Featured नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : अलिबागहून वाचवला नाशिकचा ‘कावळा’

Share

तारीख 27 मे वेळ दुपारी 12.30 ची. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील किल्ला आणि चौपाटी फिरून झाल्यावर पाणी घ्यावं म्हणून समोरच्या दुकानात गेलो.

तेंव्हा त्या ठिकाणी मुंगूस इकडे तिकडे पळताना दिसत होता कळत नव्हतं का? .. पण कशाच्या तरी मागावर आहे, हे मात्र समजलं.. आता मुंगूस म्हंटलं की साप डोळ्यासमोर येतो.. म्हणून जर पुढे होऊन बघितलं तर एक कावळा त्या मुंगसाला हुलकावणी देत होता..

मुंगसाच्या तोंडाला त्याचा पंख लागला पण तो निसटला आणि  साडेतीन चार फुटाच्या एक झाडावर उडून बसतो न बसतो तोच सर्रकन मुंगूस तो जिथे बसला तिथे पोहचलाही आणि त्याने कावळ्याला झटक्यात पकडले आणि खाली उतरून झुडुपात गेलाही.

काही कळायच्या आत हे सगळं घडलं होत.. मी मुंगसाचे हे रूप कधी बघितलं नव्हतं.. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास होईना.. मी त्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला त्याने झुडपात बसून कावळ्याचा पुरता फडशा पडला होता..

अवघ्या काही सेकंदांत त्याने त्याच्यावर घेतलेला ताबा..आता जिवंत असलेला कावळा क्षणार्धात मुगसाच भक्ष झाला होता.. मनात वेगवेगळे विचार यायला लागले पण निसर्ग चक्रापुढे माणूस काहीही करूच शकत नाही हे ही तितकच खरं.. मनापासून कावळ्याला वाचवायला हवं होतं अशी हुरहूर लागून राहिली चित्र डोळ्यासमोरन जात नव्हतं..

त्या विचारात असतानाच ..दादा साळवे ,राहणार टाकली रोड, साळवे मळा, गांधीनगर मागे… PH.9657299303 यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, एक कावळा त्याला उडता येत नाही.. खाली जमिनीवर आहे.. बहुदा तो जखमी असावा..

मी नाशिकमध्ये नाही पण आहे त्या ठिकाणाहून काही मदत करत येऊ शकते. त्यासाठी मी त्यांना काही प्रश्न विचारले, त्यात त्याला चालता येत का?  इतर कावळ्या पेक्षा लहान दिसतो का? त्याच्या आजूबाजूला दोन कावळे घिरट्या घालत आहे का ? त्यावर त्यांनी सगळी उत्तर होकारार्थी दिली..

त्यांना म्हणालो,  काळजी करू नका ते लहान पिल्लू आहे आणि घिरट्या घालणारे दोन कावळे त्याचे जन्मदाते.. त्याला पाणी ठेवा ..त्याला हाताळू नका… थोड्या वेळाने तो प्रयत्न करून उडून जाईन.

संध्याकाळी त्यांनाच फोन आला समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की, तुम्ही जे बोलला ते अगदी बरोबर होतं.. आणि झालंही तसच.. ऐकून समाधान वाटलं..  अलिबाग आणि जवळील बीच फिरून येई पर्यंत ही आनंदाची बातमी त्यांनी दिली होती..

सकाळी मुंगसापासून कावळ्याला न वाचवू शकल्याच शल्य..त्यानंतर ही घटना.. विचार करताना जाणवलं की तुमच्या मनात असलेली इच्छा मनापासून असली..की कोणत्या न कोणत्या स्वरूपात तुमच्याकडून ती पूर्ण होते. फक्त भावना निस्वार्थ आणि परोपकारी असावी.

एक घटना सांगते ते चक्र आहे त्याला अन्नसाखळी म्हणतात. प्राणी कुणा तरी दुसऱ्या प्राण्याला खाणार तर जगणार म्हणून कदाचित त्यावेळी मी मुंगसापासून त्या कावळ्याची सुटका करू शकलो नाही..
पण देवांने पुढच्या क्षणाला माझ्या मनात असलेली प्रामाणिक भावना दादा साळवे यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेतली.. माझी मूलं आणि बायको यांनाही या गोष्टीचं आश्चर्य वाटल्या वाचून राहिलं नाही ..
शेवटी दादा साळवे आणि त्यांच्या सोबतचे मित्र परीवार यांना मनापासून धन्यवाद .. प्राणी पक्षावर प्रेम करणे प्रत्येकालाच जमतं असं नाही पण ज्याला जमलं त्याला स्वर्गसुख मिळाल्या शिवाय राहत नाही .. साळवे दादा आपल्याकडून अशीच पक्षी प्राण्यांची सेवा या पुढेही घडत राहो.. मनापासून शुभेच्छा..
विक्रम राजाभाऊ कदम (9325545569)
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!