Video : ग्रामीण पोलिसांची विघ्नहर्ता गणेशोत्सव बक्षीस योजना; सोबत तगडा पोलीस बंदोबस्त

७१ हद्दपार, संपूर्ण गणेशोत्सवावर सीसीटीव्ही वॉच

0

नाशिक दि. १२ | नाशिक ग्रामीण पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली आहे. एक गाव एक गणपतीच्या आवाहनानंतर एक हजार गावात ही संकल्पना राबविण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण तीन हजार सार्वजनिक व १६० खासगी गणेश मंडळे गणेशोत्सवात सहभागी झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी ७१ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच संपूर्ण गणेश मंडळांवर आणि विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही वॉच असणार आहे.  ग्रामीण पोलिसांनी गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सर्वच प्रकारचे प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरी करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे.

आज आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी विघ्नहर्ता गणेशोत्सव बक्षीस योजना २०१८ चे अनावरण केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड,   स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक दराडे म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरी करण्याकरिता प्रभारी अधिकारी आणि बीट अंमलदार गावोगावी भेट देऊन याबाबत जनजागृती करत आहेत. तसेच गतवर्षी   प्रथमच सुरु करण्यात आलेली व यशस्वी झालेली विघ्नहर्ता बक्षीस योजना पुन्हा यावर्षीही राबविण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले.

ही योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात येणार असून या त्रिस्तरीय योजनेतून पोलीस ठाणे, उप विभाग व जिल्हा स्तरावर स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत.

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. गणेश मंडळांचे प्रबोधन शाळा,  महाविदयालयीन विदयार्थ्यामध्ये बॅनर, पोस्टर पत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी घालून दिलेले नियम न पाळल्याने दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच ३९ जणांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण साठ पेक्षा अधिक ध्वनीमापन यंत्रे सर्व पोलीस ठाणे व उपविभागीय स्तरावर बसवण्यात आली आहेत.

असा आहे पोलीस बंदोबस्त

1 पोलीस अधीक्षक, 2 अपर पोलीस अधीक्षक, 11 पोलीस उप अधीक्षक, 45  पोलीस निरीक्षक निरीक्षक, 125 सहा.पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक,  2800 पोलीस कर्मचारी, 1400 होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या,  दंगल नियंत्रण पथक, घातपात विरोधी तपासणी पथक, स्टा्र यकिंग फोर्स. यासोबतच पोलीस मित्र, ग्रामरक्षक दल यांची वेळप्रसंगी मदत,

सीसीटीव्ही वॉच 

अनुचित प्रकार टाळण्यासाठी 25 सी.सी.टी.व्ही.कॅमेरे,  4 व्हिडीओ कॅमेरे वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. तसेच 140 ठिकाणी गणेश मंडळे व विसर्जन मार्गावर सी.सी.टी.व्ही.  कॅमेरे लावण्यात आले आहेत. गणेश विसर्जनाच्या मुख्य ठिकाणी लायटर, जनरेटर, जीवरक्षक, बोट आदि व्यवस्था करण्यात आली आहे.

हे करा.. अन्यथा कारवाईला सामोरे जा… 

गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांचे परवाने घेणे, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, अधिकृत वीज कानेक्षक घ्यावे, आक्षेपार्ह देखावे लाऊ नये, मंडळापासून सुरक्षित अंतरावर वाहन पार्किंग सोय करावी, सीसीटीव्ही बसवणे, स्वयंसेवक नेमणे, ध्वनी प्रदूषणाची मर्यादा पाळावी,

७१ हद्दपार, अनेकांवर कारवाई 

गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी 71 जणांवर हददपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच सी.आर.पी.सी. 110 प्रमाणे 40, सी.आर.पी.सी. 107 प्रमाणे 1225, मुंबई दारुबंदी अधिनियम का. क. 93 प्रमाणे 46 याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक संजय दराडे यांचे आवाहन 

LEAVE A REPLY

*