शेतकरी संपावर ठाम; संपाचे केंद्र नाशिककडे; पालकमंत्री नाशिककडे रवाना

0

नाशिक, ता. ३

संप मिटल्याची घोषणा झाल्यानंतरही नाशिकचे शेतकरी संपावर ठाम असून पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाचे केंद्र नाशिककडे सरकल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिककडे रवाना होण्यास सांगितल्याचे समजते.

काल रात्री शेतकऱ्यांच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले असले, तरी पदरात आश्वासनाशिवाय काहीच पडल्याने राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याचे ठरविले आहे.

आज सकाळी नाशिक येथील बाजार समितीत कुठ्ल्याही प्रकारच्या भाजीपाल्याची आवक झाली नाही. सकाळपासूनच संतप्त शेतकऱ्यांनी बाजारसमितीत धाव घेऊन संपावर ठाम राहण्याची भूमिका घेतली.

राज्य सरकारने मुठभर शेतकरी प्रतिनिधींना फूस लावून संप मागे घेतल्याची परस्पर घोषणा केल्याने किसान क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. पहाटे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेला निर्णय आम्हाला मान्य नसून नाशिकमधील संप सुरूच राहील अशी भूमिका येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आली.

त्यामुळे आता शेतकरी संपाचे नेतृत्व नाशिक जिल्हा असून नाशिक संपाचे मुख्य केंद्रबिंदू बनले आहे. यावेळी कोअर कमिटीच्या बैठकीत उद्या (दि. 5) रोजी दुपारी 4 वाजता राज्यातील शेतकरी प्रतिनिधीची बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शेतकर्‍यांचा राज्यव्यापी संप मागे घेण्याची घोषणा केल्याने नाशिकमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. त्यामुळे संप मागे घेण्याची घोषणा होऊनही नाशिकमधील शेतकर्‍यांनी सरकारविरोधी संघर्षाचा पवित्रा कायम ठेवला आहे. आज नाशिक बाजार समितीच्या आवारात शेतकरी संप कोअर कमिटीची बैठक झाली.

यावेळी जिल्हाभरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. प्रसंगी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकर्‍यांनी आपला संपात व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसूनही सरकारने संप मागे घेतल्याचे जाहीर कसे केले असा सवाल शेतकर्‍यांनी यावेळी उपस्थित केला.

शेतकरी प्रतिनिधींही राज्यातील शेतकर्‍यांना विश्वासात न घेता संप मागे घेतल्याचे जाहीर केल्याने या प्रतिनिधींविरोधातही शेतकर्‍यांनी रोष व्यक्त केला.

या घटनेमुळे आतापर्यंत नगर जिल्ह्यातील पुणतांबे येथून हलवण्यात येणारी संपाची सुत्रे आता नाशिकच्या शेतकर्‍यांनी हाती घेतले आहे. सरकारशी चुकीच्या वाटाघाटी केल्याबद्दल कोअर कमिटीच्या शेतकर्‍यांमध्येच वाद निर्माण झाला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*