Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये राजकीय भूकंप; विद्यमानांसह कार्यकर्ते नाराज, पूर्वमध्ये नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत?

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात नगरसेवक राहुल ढिकले यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याची चर्चा असून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना डावलून उमेदवारी दिल्यामुळे पंचवटी परिसरातील नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. 

स्थायी समिती सभापती उद्धव निमसे आणि बाळासाहेब सानप यांच्या वादात ढिकलेंची लॉटरी लागल्याल्याचे बोलले जात आहे. मात्र, विद्यामानांना डावलून दुसऱ्या पक्षातील उमेदवारास भाजपने उमेदवारी दिल्यामुळे पूर्वमधील राजकीय वातावरण तापले आहे. 

आमदार सानप यांच्या निवासस्थानी समर्थकांची मोठी गर्दी झाली असून यात अनेक नगरसेवकांचा समावेश आहे. यामुळे सानप यांचे राजकीय पुनवर्सन पक्ष करेल की, सानप दुसऱ्या पक्षात प्रवेश करून पूर्वमधील विजयी घोडदौड सुरु ठेवतील याबाबत त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

 

सानप समर्थकांनी भाजप नगरसेवकांसह शिवसेनेच्या शिवसेनेलाही सोबत घेतले असल्यामुळे सानप यांचे बळ पंचवटीत वाढले आहे. तर तिकडे ढिकले यांच्या भाजपच्या उमेदवारीबाबत पक्षाकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नसली तरी आज ढिकले यांनी आज मनसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे पूर्वमधून ढिकले यांची भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!