Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

रमजान ईद निमित्त शाहजानी ईदगाह मैदानावर नमाज पठण; शांतता, दुष्काळ हद्दपार व्हावा यासाठी विशेष दुवा

Share

नाशिक | प्रतिनिधी

काल (मंगळवारी) २९ रोजे पूर्ण होऊन आकाशात पवित्र ’ईद-उल-फित्र’ चे चंद्रदर्शन झाल्यानंतर आज सकाळी एक लाखापेक्षा अधिक मुस्लिम बांधवांनी रमजान ईदनिमित्त शाहजानी ईदगाह मैदानावर नमाज पठण केले. यावेळी देशात शांतता अबाधित राहावी, भरपूर पाऊस पडावा यासाठी विशेष दुवा करण्यात आली. खतीबे नाशिक हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या उपस्थितीत नमाज पठण झाले. यावेळी सूत्रसंचालन हाजी मुक्तार अश्रफी यांनी केले.

आज सकाळी सुमारे एक लाख भाविक नमाजपठण करण्यासाठी शाहजीन ईदगाह मैदानावर आले होते. शेतकरी, देशातील शांतता आणि पावसाचे प्रमाण वाढावे, दुष्काळ हद्दपार व्हावा यासाठी विशेष दुवा मुस्लीम बांधवांनी याप्रसंगी केली. नमाज पठण झाल्यानंतर गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांचे महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप यांच्यासह पोलीस आयुक्त नांगरे पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, हेमलता पाटील, शरद आहेर, सुहास फरांदे, यांची याठिकाणी उपस्थिती होती.

काल रात्री चंद्र दिसल्याची घोषणा होताच बाजारात एकच गर्दी उसळली होती. मेनरोड, शिवाजीरोड, भद्रकालीसह मीना बाजारात रात्री उशिरापर्यंत ईदची खरेदी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत बारीक सारीक गोष्टी खरेदीसाठी मुस्लिम बांधव बाजारात फिरत होते.

सर्व फोटो : सलीम खान, नाशिक.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!