Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुथूट फायनान्स दरोडा प्रकरण : आकाशसिंगच्या पोलीस कोठडीत वाढ

Share

नाशिक । प्रतिनिधी

मुथूट दरोडा व गोळीबार प्रकरणी मुख्य संशयित आकाशसिंग राजपूत याची पोलीस कोठडीत न्यायालयने दोन दिवसांची वाढ केली आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेला पिस्तोल हस्तगत करणे बाकी असल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाने केला होता.

गुन्हे शाखा एकच्या पथकाने तब्बल 16 दिवस बिहारमध्ये आरोपीवर पाळत ठेऊन आकाशसिंगच्या 25 जुलै रोजी बिहार राज्यात मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. मुथूट सशस्त्र दरोड्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे.

सॅज्यू सॅम्युअलवर पहिली आणि एकूण पाच गोळ्या आकाशसिंगने झाडल्या होत्या. न्यायालयाने यापुर्वीच आकाशसिंगला 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या दरम्यान पोलिसांनी आकाशसिंगकडे सखोल चौकशी केली होती.

दरम्यान, आज मंगळवारी आकाशसिंगच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला तपासाधिकारी तसेच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारे यांनी कोर्टात हजर केले.

सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विद्या देवरे-निकम यांनी बाजु मांडली. संशयित आरोपीने गुन्ह्यात वापरलेली बंदुक हस्तगत करणे बाकी असल्याने सरकारी पक्षाने त्याच्या कोठडीची मागणी केली.

बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने आकाशसिंगच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. या गुन्ह्यातील आकाशसिंगचा भाऊ जितेंद्रसिंग राजपूत आणि परमेंदरसिंग यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

14 जून रोजी उंटवाडीरोडवरील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील आकाशसिंग हा महत्वाचा दूवा असल्याने या गुन्ह्यावर स्पष्ट प्रकाश पडला आहे.

अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उत्तर प्रदेश तसेच बिहार राज्यातील सराईत गुन्हेगारांनी एकत्र येऊन दरोड्याचा प्लॅन आखला होता. या गुन्ह्याचा मास्टरमाईंड सुबोध सिंग असून, सध्या तो सुद्धा बिहारमधील एका जेलमध्ये बंद आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!