Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सातपूर : दारूसाठी जन्मदात्या आईचा खून

Share

सातपूर | वार्ताहर

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने आईस मारहाण केल्यानंतर जखमी आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सातपूर परिसरात घडली. याप्रकरणी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सातपूर पोलीस करत आहेत.

याप्रकरणी सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांताबाई शिवलाल काळे (वय ८२, रा. दादासाहेब गायकवाड नगर, सातपूर राजवाडा) येथे राहणाऱ्या आईस मुलगा कमलाकर शिवलाल काळे (वय ५७ ) याने गेल्या आठवड्यात दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने रागाच्या भरात त्याने आईस मारहाण करत डोके भीतीवर आपटले.

यामध्ये आई गंभीर जखमी झाली होती. जखमी आईला उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. .

याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात प्रभाकर काळे याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मुलगा कमलाकर काळे यास ताब्यात घेतले असून वरिष्ठ निरीक्षक विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!