Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

Video : हळूहळू मुंबई-पुणे रेल्वे पूर्वपदावर

Share

मुंबई | वृत्तसंस्था

मुंबईतील पावसाच्या हाहाकाराने विस्कळीत झालेली रेल्वे सेवा आजपासून पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंटरसिटी, इंद्रायणी या गाड्यांसह अन्य गाड्याही नियोजित वेळेत धावणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

पुणे-मुंबईदरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती. यातच मुंबई आणि उपनगरांत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली होती. परिणामी प्रवाशांचे हाल होत होते.

रविवारी पुणे- मुंबई मार्गावरील अनेक गाड्या रद्ददेखील झाल्या तर काहींचे मार्ग बदलले होते. यामध्ये प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. काल दुपारनंतर पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे अनेक मार्गांवर तात्काळ मेगाब्लॉक घेऊन रेल्वे मार्ग दुरुस्त्या करण्यात आल्या.

रेल्वेमार्गातील अडथळा दूर करण्यात आला असून आजपासून रेल्वे पूर्ववत होणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आज जर पावसाचे तीव्रता वाढली तर स्थिती पाहून वेळेत बदल केले जातील असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

रविवारी रद्द झालेल्या गाड्या

– मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस

– मुंबई-हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस

– हुजूर साहिब नांदेड-पनवेल एक्स्प्रेस

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!