Type to search

Breaking News Featured गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

Video : मुंबई-कुर्ला एक्स्प्रेसमध्ये सर्वधर्मीयांचा अनोखा गणेशोत्सव

Share
मनमाड (प्रतिनिधी) | राज्यात सर्वत्र बाप्पाचे आज जल्लोषात आगमन झालेले असतांनाच मनमाडच्या सर्वधर्मीय
चाकरमान्यांनी देखील मनमाड कुर्लागोदावरी एक्सप्रेसमध्ये उत्साहात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

गेल्या 22 वर्षापासून गोदावरी एक्स्प्रेसमध्ये श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात असून आजची पहिली आरती नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र खैर यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनमाड शहरातून मोठ्या संख्येने नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी गोदावरी एक्स्प्रेसने नाशिक, मुंबईला ये-जा करतात. प्रवासात कोणतेही विघ्न येऊ नये, जातीय सलोखा आणखी दृढ व्हावा या उद्देशाने १९९६ साली हिंदू-मुस्लीम चाकरमान्यांनी एकत्र येऊन गोदावरी एक्स्प्रेस सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली.

तेंव्हापासून आज गेल्या 22 वर्षापासून गोदावरी एक्स्प्रेसमध्ये अविरत बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे.

यासाठी पास बोगीची आकर्षक पद्धतीने सजावट केली जाते. सकाळची आरती मनमाडला तर सायंकाळची आरती नाशिकरोडला केल्यानंतर गाडीतील प्रवाशांना प्रसाद वाटप केला जातो. गोदावरी एक्स्प्रेसमध्ये साजरा होणारया या आगळ्या – वेगळ्या गणेशोत्सवाची राज्यभर ख्याती आहे.

व्हिडीओ आणि बातमी : बब्बू शेख, देशदूत डिजिटल मनमाड

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!