Type to search

Breaking News maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

मुंबईची जुही कजारियाची आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत बाजी

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचे नुकतेच निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दहावीत मुंबईची जुही कजारिया हिने बाजी मारली आहे. यंदा आयसीएसई दहावीचा ९८.५४ टक्के निकाल लागला तर तर आयएसईचा १२ वीचा ९६.५२ टक्के निकाल लागला आहे.

दहावीत जुहीला ९९. ६० टक्के गुण मिळाले आहेत. तर मुंबईची अनुश्री चौधरी, यश भन्साळी व अनुष्का अग्निहोत्री हे दुसऱ्या स्थानी राहिले. जुही मुंबईतील जमनाबाई बजाज शाळेची विद्यार्थिनी असून तिच्या यशाने तिचे देशभरात कौतुक केले जात आहे.

आयसीएसई, आयएसई परीक्षांचा निकाल सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. यंदा आयसीएसई १० वीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान झाली. तर, आयसीएसई १२ वीची परीक्षा ४ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान घेण्यात आली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!