Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सुभाष भामरे; नाशिक शहराध्यक्षपदाची सूत्रे गिरीश पालवेंकडे

Share

नाशिक | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये प्रदेश उपाध्यक्षपदी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार व माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिक शहराध्यक्षपदाची सूत्रे गिरीश पालवे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

यासोबतच माजी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील (अमरावती), माजी खासदार किरीट सोमय्या (मुंबई), मा. योगेश गोगावले (पुणे) व अशोक कांडलकर (जळगाव) यांचीही नियुक्ती प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे.

तसेच भाजपा, प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती केली आहे. यासोबतच पुणे शहराध्यक्ष आ. माधुरी मिसाळ, पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर, जालना जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे व यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील माध्यमांच्या संपर्कप्रमुखपदाच्या जबाबदारीसह मा. केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त प्रवक्ते पुढीलप्रमाणे – मधु चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

पालवे यांच्या रूपाने युवा चेहरा 

गिरीश पालवे यांनी भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ग्रामीण अशा विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे पालवे यांच्या रूपाने शहराला युवा शहराध्यक्ष मिळाला असून युवकांना जास्तीत जास्त भाजपच्या बाजूने संघटीत करण्याचे त्यांच्यापुढील प्रमुख आवाहन राहणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!