ब्लू व्हेल सारख्या खुनी ‘मोमो गेम’पासून सावधान!

गेमच्या व्यसनापायी तासन्-तास एकाच जागी स्वमग्न बसणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा

0

देशदूत डिजिटल विशेष

खूप मोठा वर्ग  मोबाईल किंवा व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेलेला आहे. तरूणाईला गेम्सचे  व्यसन लागलेले असून  गेम्सच्या आहारी जाऊन अनेक शारीरिक आणि मानसिक विकार त्यांना जडले आहेत. विरंगुळा म्हणून खेळले जाणारे हे खेळ आता तरूणाईच्या जीवाशी खेळू लागले आहेत.

मागील अनेक दिवसांपासून ‘किकी डू यू लव्ह मी’.  हे  इंटरनेटवरील गणं  कीकी चॅलेंजमुळे तरुणाईमध्ये अतिशय लोकप्रिय झालेलं दिसून आलेलं आहे. आणि यातील धोके बघून जगभरातील अनेक शहरांमध्ये या चॅलेंजवर बंदी घालण्यात आलेली आहे.

ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर या कीकी चॅलेंजने धुमाकूळ घातलेला आहे. जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर डर्क नावाच्या  एक प्रसिद्ध गायकाचे  इन माय फिलिंग हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालंय…त्या गाण्यावर नाचायचा हा खेळ आहे.

या खेळात चॅलेंज स्वीकारणाऱ्या इसमाने चालू गाडीमधून खाली उतरून हळूहळू चालणाऱ्या गाडीच्या दराजवळ नाचायचे आणि काही अंतर गेल्यावर पुन्हा चालू गाडीत येऊन बसायचे. हे सगळं करताना गाडी चालविणारी व्यक्ती  नाचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शूट करतो.

काही देशांमध्ये हा खेळ इन माय फिलींग्स चॅलेंज नावाने देखील ओळखले जातो  आणि खेळात शूट केलेल्या धोकादायक डान्सचे व्हिडीओ #InMyFeelingsChallenge हा हॅशटॅग वापरून शेअर केले जातात तसेच काही तरुण #KiKiChallenge हा हॅशटॅग वापरून या चॅलेंजचे व्हिडीओ शेअर करतात.

कीकी चॅलेंज हे नाव कसे?

इन माय फिलिंग या गाण्यातील पहिल्या कडव्यातील बोल किकी डू यू लव्ह मी असे आहे. त्यामुळे या खेळाला कीकी चॅलेंज असे नाव पडलेले आहे.

खेळास बंदी 
‘हे चॅलेंज अर्थात खेळामुळे तो खेळणाऱ्याच्या जीवाला धोका तर आहेच शिवाय, इतरांच्या जीवालाही धोका पोहचू शकतो
त्यामुळे मुंबई पोलिसांनी या खेळावर बंदी आणलेली आहे. नागरीकांना  अशा प्रकारच्या चॅलेंजच्या माध्यमातून त्रास द्यायचं थांबविले नाहीतर हा खेळ खेळणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिलेला आहे.

मोमो गेम
दोन वर्षांपूर्वी आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल नावाच्या भयानक  गेमने जगात  दहशत पसरवली होती.
एकट्या भारतातच अनेक मुलांनी आत्महत्या केल्या होत्या.  देखील डिझाइन केलेले आहेत. कमकुवत मनाच्या व्यक्तींना जगायचा अधिकार नाही या विचित्र मानसिकतेतून ब्ल्यू व्हेलची निर्मिती झाली हाती आणि आता त्याचीच पुढील आवृत्ती म्हणून मोमो गेम दाखल झालेला आहे तेव्हा सावधान!

आता त्यापेक्षाही भयंकर असा ‘मोमो’ हा नवीन गेम सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लोकांना घाबरविण्यासाठी बनविलेला हा गेम आत्महत्येला प्रवृत्त करतो  आहे.

या खेळाबद्दल 
‘मोमो व्हॉटस्ऍप’ एक क्रमांक आहे. जो व्हॉटस्ऍपवर शेअर केला जातोय. हा क्रमाक सर्वप्रथम फेसबुकवर आढळला . मोमो गेमचा क्रमांक जपानशी संबंधित असल्याची माहिती आहे.  आत्महत्या करण्यासाठी हळूहळू उत्तेजित करतात.
सुरुवातीला एक भयानक फोटो पाठविला जातो. यानंतर अशाच प्रकारचे बरेच भयानक फोटो व व्हिडीओ क्लीपही पाठवले जातात.

मोमो चॅलेंजमध्ये, अज्ञात नंबर वापरकर्त्यांना दिला जातो, तो सेव्ह केल्यावर  मग त्या अज्ञात क्रमांकाशी बोलण्याचे आव्हान दिले जाते. पुढे या अज्ञात कॉन्टॅक्ट नंबरवरून आपल्याला वेगवेगळे टास्क दिले जातात. सुरुवातीला सोपे वाटणारे हे टास्क पुढे हिंसक होत जातात.

टास्क पूर्ण न केल्यास यूजरला धमकी देतात. धमकीला घाबरून युजर मानसिक संतूलन गमावतात आणि आत्महत्येस प्रवृत्त होतात. गुन्हेगार युसर्सची वैयक्तिक माहिती चोरून ती उघड करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणीदेखील वसूल करतात.

या खेळापासून कसे दूर राहावे?
मोबाईलच्या आहारी गेलेल्या लहान मुलांवर लक्ष ठेवा त्यांच्या वागण्या-बोलण्यात बदल दिसला तर त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधून त्यांच्या वागण्याबद्दल अधिक माहिती मिळवा.

तुम्हाला जर अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअपवर किंवा एसएमएस वर विचित्र  मेसेज आला तर तो  लगेच डिलीट करा आणि त्याचा  कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करू नका.

चुकून सेव्ह झालेल्या नंबरवरून जर कुठलाही विचित्र  गेम खेळण्यासाठी  उकसवण्यात आलं तर त्याकडे दुर्लक्ष केलेले केव्हाही हिताचेच असेल.
– प्रा योगेश  हांडगे

LEAVE A REPLY

*