Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘व्ही.एन. नाईक’मधील स्वच्छतागृहात व्हिडीओ शुटींगचा प्रकार; सुरक्षा रक्षकास चोप

Share

नाशिक | प्रतिनिधी

महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात शिक्षिकेचे व्हिडीओ शुटींग करतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुरक्षा रक्षकास पोलिसांनी ताब्यात  घेतले आहे. शहरातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या व्ही. एन. नाईक महाविद्यालयात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शिक्षिका स्वच्छतागृहात गेल्या होत्या. याच वेळी संशयित सुरक्षा रक्षक स्वच्छतागृहाचे मोबाईलमध्ये शुटींग करताना नजरेस पडला. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, सुरक्षा रक्षकास महाविद्यालायातील विद्यार्थ्यांनी पकडून बेदम चोप दिला. सरकारवाडा पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी विनयभंगाची तक्रार दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू आहे.

सुरक्षा रक्षक खासगी कंपनीचा असल्याचे शिक्षण संस्थेकडून  सांगण्यात आले आहे. संबंधित सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपनीवर संस्था काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!