Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आमदार पत्नींच्या तत्परतेने वाचले गिऱ्हेवाडी येथील अपघातग्रस्त कुटुंबाचे प्राण

Share

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे

अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळाले तर ते वाचू शकतात याचा प्रत्यय नुकताच आला. सिन्नरच्या विद्यमान आमदारांच्या पत्नी दीप्ती वाजे यांना आला. त्या प्रवास करत असताना रस्त्यात एका आदिवासी जोडप्याचा अपघात झालेला दिसून आला त्यानंतर त्यांनी कुठल्याही क्षणाची प्रतीक्षा न करता या जोडप्याला आपल्या वाहनातून रुग्णालयापर्यंत पोहोचवले. जखमीवर वेळीच उपचार झाल्याने जखमीची प्रकृती स्थिर आहे.

अधिक माहिती अशी की, सिन्नरहुन दुचाकीरून इगतपुरी तालुक्यातील गिऱ्हेवाडी येथील एक जोडपे रस्त्याने दुचाकीवरून जात होते. याच वेळी त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील गंगाराम पुंडलिक गिर्हे, कमल गंगाराम गिर्हे, स्वाती गंगाराम गिर्हे वय (वय ६) हे जखमी झाले होते.

दरम्यान, दीप्ती वाजे या सिन्नरला जात असताना त्यांच्या नजरेस अपघातग्रस्त कुटुंबीय पडले. त्यानंतर  त्यांनी तात्काळ चालकास गाडी थांबविण्यास सांगत अपघातग्रस्तांना आपल्या गाडीत बसवले. त्यांना घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करून त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचाराच्या सूचना केल्या.

अपघात ग्रस्तावर वेळेवर उपचार झाल्याने जखमीची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, वाजे यांनी कार्यतत्परता दाखवली नसती तर घरधान्याचे बरेवाईट झाले असते. आदिवासी कुटुंबातील व्यक्तींनी कृतज्ञता व्यक्त केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!