Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : …अन् दिव्यांग भिक्षुकाच्या अंत्यविधीला पोहोचले आ. झिरवाळ, संपूर्ण खर्चही उचलला

Share

दिंडोरी : प्रतिनिधी

वणी येथे भिक्षा मागुन उदरनिर्वाह करणाऱ्या शारिरीक दृष्ट्या विकलांग युवक कार्यकर्ता दिपक भाऊसाहेब गांगुर्डे याच्या निधनाचे वृत्त कळताच आमदार नरहरी झिरवाळ यांनी नियोजीत कार्यक्रम रद्द करुन थेट अंत्यविधीला हजेरी लावली. यावेळी दिपकच्या आठवणींना उजाळा देतांना आ. झिरवाळ भावुक झाले. तसेच सदर व्यक्तीच्या दशक्रिया विधीचा खर्च देखील करणार असल्याचे सांगीतले.

यावेळी श्रद्धांजली अर्पण करतांना त्याच्या आठवणींना उजाळा देतांना आ. झिरवाळ म्हणाले की, “माझी स्वत:ची दोन मुले आहे त्यांनी कधी एखाद्या गोष्टीचा हट्ट केला नाही तितका हट्ट हा युवक करायचा, तसेच माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा तो प्रचंड चाहता होता. तसेच परवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वणीत शहरात आलो तेव्हा गर्दीतुन वाट काढत दिपक जवळ आला आणि मला कडकडुन मिठी मारली आणि ती दुर्दैवाने शेवटची भेट ठरली” असे म्हणतांना आ. झिरवाळ भावूक झाले होते.

वणी बसस्थानक परिसरात मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेऊन काळी-पिवळी टॅक्सी सफाई करणे तसेच वेळप्रसंगी भिक्षा मागुन खाणारा युवक दिपक भाऊसाहेब गांगुर्डे हा युवक दिंडोरी -पेठ विधान सभेचे आमदार नरहरी झिरवाळ यांचा कट्टर समर्थक होता.

आमदार झिरवाळ वणीला येणार असल्याचा कुणाकडुन निरोप मिळाल्यास तो तासन्-तास वाट बघत बसायचा. तसेच एखाद्या आठवड्यात आमदार झिरवाळ यांची भेट न झाल्यास मिळेल त्या वाहनाने यांचे वनारे गाव गाठुन सुमारे ५ किमी पायी चालुन आ. झिरवाळ यांचे घर गाठायचा.

तिथे आ झिरवाळ यांची भेट घेऊन, चहा-जेवन हक्काने मागुन पुन्हा परतीच्या प्रवासाला निघायचा. गत विधानसभा निवडणुकीदरम्याण त्याने डोक्यावर चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले घड्याळ कोरुन घेतले होते.

तसेच मतमोजणीच्या दिवशी झिरवाळ यांचा विजय झाल्यानंतर वणीत दाखल झालेल्या आ. झिरवाळ यांना कडकडुन मिठी देखील मारली होती. ती शेवटची भेट ठरली. दिपकच्या आकस्मित मृत्युबद्दल वणी टॅक्सी-चालक मालक संघटनेने देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!