Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक पूर्वमधून बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीची उमेदवारी; जोरदार शक्तीप्रदर्शनात दाखल करणार उमेदवारी अर्ज

Share

पंचवटी | प्रतिनिधी 

भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार आणि माजी शहरअध्यक्ष बाळासाहेब सानप यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर ते आज राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत. यावेळी सानप यांच्यासोबत मोठ्या कार्यकर्त्यांचा ताफा असून नाशिक पूर्वमधील अनेक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादीचे नाशिकचे नेतेही सानप यांच्या कळपात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले आहेत.

सानप यांच्या निर्णयामुळे नाशिक पूर्वमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी नगरसेवक राहुल ढिकले आणि राष्ट्रवादीकडून बाळासाहेब सानप अशी लढत होणार आहे. मात्र, सोमवारी उमेदवारांच्या माघारीचा दिनांक असून यादिवशी कोण माघार घेईल याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेच्या जोरदार शक्तीप्रदर्शनानंतर आता राष्ट्रवादीकडूनही बाळासाहेब सानप जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. थोड्याच वेळात बाळासाहेब सानप उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचणार असल्याची माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.

बाळासाहेब सानप यांचे पारडे जड 

बाळासाहेब सानप यांचा जनसंपर्क या मतदार संघात दांडगा आहे. दरम्यान, मुर्तडक जे मनसेनेचे याच मतदार संघातील उमेदवार आहेत त्यांच्यासोबतदेखील सानप यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे, याचा फायदा सानप यांना होण्याची शक्यता आहे. या मतदार संघात जातीय समीकरणे बदलली तर याचा फायदा सानप यांनाच होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!